आवृत्ती पुणे
← Back to Homepage

टँकर-दुचाकीच्या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 7, 2022

अपघातानंतर प्रचंड वाहतूककोंडी : सिंहगड रोड-धायरीजवळ घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सिंहगडरोड येथील धायरी येथे टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत दुचाकी चालक महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या दरम्यान घडली. वृषाली विश्वनाथ तांबे असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, मृत वृषाली तांबे या धायरीतील रायकर मळा इथं लक्ष्मीनारायण सोसायटीत वास्तव्यास आहेत. सकाळी ऑफिसला जाण्याची वेळ असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच वृषाली या मुक्ताई गार्डन परिसरातून दुचाकीने जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने दुचाकीला जोरात धडक दिली. यात दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, वृषाली तांबे या कर्वेनगर येथील पोस्ट ऑफिसमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातानंतर सिंहगड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

get_footer();