आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तरूणीला दारू पाजून बलात्कार करणार्‍याची येरवड्यात रवानगी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 12, 2021

न्यायालयाने सुनावली शिक्षा : पुण्यातील तळजाई जंगलात घडली होती घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मित्रानेच वाढदिवस असल्याचे सांगत मित्रासह 22 वर्षीय तरुणीला तळजाई येथील जंगलात नेऊन त्याठिकाणी दारु पाजून बलात्कार केल्याप्रकरणात सहकारनगर पोलिसांनी अटक केलेल्या शुभम सिताराम शिंदे (वय १९, रा. धनकवडी) याची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी पहिल्याच कारणाने पुन्हा पोलीस कोठडी मागितली जात आहे. त्याच्याकडे अधिक तपास करण्याची गरज नसल्याचा युक्तीवाद अ‍ॅड. जितेंद्र सावंत आणि अ‍ॅड. अभिजित सोलनकर यांनी केला.
22 वर्षीय तरूणीने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. जितेंद्र सावंत, अ‍ॅड. अभिजित सोलनकर, अ‍ॅड. हितेश सोनार, अ‍ॅड. अक्षय कदम आणि अ‍ॅड. अक्षय वाडकर यांनी बाजू मांडली.

शिंदे याने पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याचे सुमारास वाढदिवस असल्याचे सांगत पार्टी करण्यासाठी तळजाई शेवटचा बसस्टॉप याठिकाणी तिला बोलाविले. त्यानंतर एका मित्रासह तिघे तळजाई येथील जंगलात दारु पिण्यासाठी गेले. त्याठिकाणी दारु पिल्यानंतर तरुणीला थंडी वाजू लागल्याने ती त्याचठिकाणी बाजूला झोपली होती. त्यावेळी आरोपी शिंदे याने तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पुढील तपास सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई करत आहे.

get_footer();