आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तीनपत्ती खेळाच्या वादातून तरुणाचा खून करणारे तिघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 16, 2021

पिंपरीत प्रचंड खळबळ : तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी केली कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : तीनपत्ती खेळताना झालेल्या वादातून एका तरुणाचा चाकूने खून केल्याची घटना इंदोरी (ता. मावळ, जि. पुणे) येथे शनिवारी (दि.13) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

शाबुद्दीन अन्सारी (वय-21) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रियाज निसार अन्सारी (वय २३, रा. इंदोरी, ता.मावळ मुळ रा. उत्तर प्रदेश) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जलाल शेख, मोहम्मद इस्लाम अन्सारी, मोहम्मद इस्त्राईल अन्सारी (तिघे रा. इंदोरी) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी, आरोपी आणि मयत हे चौघे इंदोरी येथे भाड्याच्या खोलीत राहतात. शनिवारी रात्री ते तीनपानी पत्ते खेळत होते. या खेळाच्या नियमावरुन शाबुद्दीन आणि जलाल शेख यांच्यात वाद झाला. त्यानंतर जलाल शेख त्याच्या घरी गेला. तो त्याच्या दोन मेहुण्यांसोबत चाकू घेऊन परत फिर्यादी यांच्या खोलीत आला. तिघांनी शाबुद्दीनला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मोहम्मद इस्लाम अन्सारी, मोहम्मद इस्त्राईल अन्सारी यांनी शाबुद्दीनला पाठीमागून घट्ट पकडले. तर जलाल याने शबुद्दीनच्या छातीवर, पोटावर, डोळ्यावर चाकूने भोकसले. यामध्ये गंभीर जखमी होऊन शाबुद्दीनचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

get_footer();