आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन मुलीला धमकावून केला लैंगिक अत्याचार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 6, 2022

हडपसर पोलिसांत फिर्याद : आरोपीने जीवे मारण्याची दिली धमकी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : माझी नाही, तर कोणाचीही होऊ देणार नाही, अशी धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. आरोपीने मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिला त्रास देऊन मारहाण केली. हा प्रकार 3 जानेवारी 2022 या कालावधीत हडपसर येथील कालव्यालगत घडला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हडपसर पोलिसांनी पीडीत मुलीच्या तक्रारीवरुन प्रथमेश वाघमारे (रा. बनकर कॉलनी, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने जून 2020 मध्ये पीडीत मुलीला धमकावून घरी घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर सोमवारी (दि.3) दुपारी 12 च्या सुमारास पीडीत मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत शाळेतून घरी जात होती. फिर्यादी मुलगी घरी जात असताना आरोपीने तिला बोलायचे असल्याचे सांगून थांबवले. मात्र तिने नकार देऊन तेथून पळून जाऊन एका ठिकणी लपून बसली. आरोपीने तिचा शोध घेऊन तू माझी आहे, माझी नाही झाली तर कोणाचीही होऊ देणार नाही, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरी जाऊन शोध घेतला मात्र, तो सापडला नाही. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे करीत आहेत.

get_footer();