आवृत्ती पुणे
← Back to Homepage

टेम्पो रिव्हर्स घेताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 13, 2021

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पुणे : महाराष्ट्र ३६०न्यूज नेटवर्क

आंबेगाव बुद्रुक येथे टेम्पोचालक टेम्पो रिव्हर्स घेत असताना पादचाऱ्याला धक्का लागून अपघात झाला. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटनी शुक्रवारी (दि. १०) नवलेब्रिजकडून कात्रज चौकाकडे जाणाऱ्या बायपास मार्गावर आंबेगाव बुद्रुक येथे घडली.

भरतकुमार प्रसाद (वय २६, रा. धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राहुल शिंदे (वय ३४, रा. आंबेगाव) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, नवले ब्रीजकडून कात्रज चौकाकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर आंबेगाव बुद्रुक येथे फिर्यादीचे वडिल फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी टेम्पोचालक टेम्पो रिव्हर्स घेत असताना फिर्यादीच्या वडिलांना धक्का लागून अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार देशमुख पुढील तपास करीत आहेत.

get_footer();