आवृत्ती पुणे
← Back to Homepage

टीईटी २०१९-२०च्या गुन्ह्यातील आणखी दोघांना अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 7, 2022

सायबर पोलिसांची कामगिरी : १२ आरोपींकडून चार कोटी ६८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : टीईटी २०१९-२०च्या गुन्ह्यामधील आणखी दोन आरोपींना सायबर पोलिसांनी नाशिक येथून अटक केली असून, आतापर्यंत १२ आरोपींना जेरबंद केले आहे. आरोपींकडून चार कोटी ६८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सुरंजित गुलाब पाटील (वय ५०, रा. गणेश ब्लिक्स, उत्तरानगर, लेन नं.२, तपोवन लिंकरोड, काठे गल्ली, नाशिक) व स्वप्नील तीरसिंग पाटील (रा. उदयसिंग अण्णा सोसायटी, शिक्षक कॉलनी, धुळे रोड, चाळीसगाव, जळगाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील तुकाराम सुपे यास अटक केली असून त्याच्याकडून रोख रक्कम व सोने-चांदी जप्त केली आहे. त्यानंतर गुन्ह्याचा सखोल तपास केला असता सुरंजित पाटील व स्वप्नील पाटील यांच्याकडे तपास केल्यानंतर प्राथमिक तपासामध्ये त्यांनी टीईटी परीक्षा २०१८ व २०१९ मध्ये अपात्र उमेदवारांकडून प्रत्येकी एक लाख १० हजार रुपये घेऊन पात्र केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दगडू हाके, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी, पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ, सचिन वाजे, नितेश शेलार, रवींद्र साळवे, नितीन चांदणे, सोनुने, अश्विन कुमकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();