आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बनावट दागिने दाखवून कारागिराने दीड कोटी रुपयांना फसविले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 14, 2021

रविवार पेठेतील घटना : फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सोन्याचे दागिने बनविण्यासाठी जवळपास ३ किलो सोने दिले असताना त्यापासून दागिने बनविले असे दाखविण्यासाठी बनावट दागिने दाखवून दागिन्यांची परस्पर विक्री करुन एका कारागीराने तब्बल १ कोटी ४३ लाख १२ हजार ७८ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

हा प्रकार २०१८ पासून सुरु होता. जमार इब्राहिम शेख (वय ४१, रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार मेहबुब शेख (रा. रविवार पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी सांगितले की, जमार शेख यांचा गणेश पेठेत कारखाना आहे.

आरोपीने फिर्यादींचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडे सोन्याचे काम करण्यासाठी २९५४ ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने घेतले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याचे हस्ताक्षरात एका डायरीमध्ये याची नोंद केली. फिर्यादी यांच्याकडून घेतलेल्या सोन्याचे बदली़ त्यांना बनावट सोने दाखवून ते खरे असल्याचे भासविले. बनावट दागिने तयार करुन ते दाखवून सध्या दागिन्यांना मागणी नाही. कोरोनामुळे दुकाने बंद आहेत.

ग्राहक नाही, असे वेगवेगळी कारणे सांगितली. प्रत्यक्षात त्याने त्या सोन्याचे दागिने बनवून त्यांची परस्पर विक्री केली. त्यांना त्याच्या सोन्याचे पैसे देऊन तो नफा असल्याचे भासविले. फिर्यादी यांनी अनेक दिवस वाट पाहिल्यानंतरही त्याने पैसे न दिल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेटे करीत आहेत.

get_footer();