आवृत्ती पुणे
← Back to Homepage

ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 9, 2021

भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी : न्यायालयाने आरोपींना सुनावली पोलीस कोठडी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने मारहाण करुन पळून गेलेल्या तिघा आरोपींना खेडशिवापूरला पकडण्यात आले. ही कामगिरी भारती विद्यापीठ पोलीसांनी केली.

अमित ऊर्फ हमिद चांदपाशा शेख (गोकुळनगर, कात्रज), विदयाधर ऊर्फ पप्पु सनातन नायक (कात्रज) प्रसाद विजय गायकवाड (गोकुळनगर, कात्रज) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, कात्रज- कोंढवा रस्त्यावर 5 नोव्हेंबर रोजी शिव कैलास हॉटेलसमारे फिर्यादी किशोर रामचंद्र मोरे ( रा.गोकुळनगर, कात्रज ) याचा मित्र रुपेश काकणु सगट (रा. आंबेगाव ) यास शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याच्या उददेशाने लाथा बुक्‍क्‍यांनी व लाकडी बांबूने डोक्‍यात व पाठीवर मारहाण करुन गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी अमित शेख व त्याच्या दोन साथीदार यांचेविरुध्द भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे अधिकारी नितीन शिंदे आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकातील अंमलदार सचिन पवार, अभिजीत जाधव व राहूल तांबे यांना एक खबर मिळाली. त्यानुसार तिघांना खेडशिवापूर येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपींना पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढमे यांनी गुन्हयात अटक करुन त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे.

पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक, संगीता यादव, विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे व अंमलदार रविन्द्र भोसले, रविंद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, निलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड, प्रविण पिसाळ यांनी केली आहे.

get_footer();