आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गुन्ह्यातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 15, 2021

दरोडा व वाहनचोरी पथक-२ची कारवाई : थेऊर फाटा येथे पकडले

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : लोणी काळभोर पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील आरोपीला थेऊर फाटा येथे सापळा रचून अटक केली. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ने ही कारवाई केली.

राम सिद्धेश्वर यादव (वय २९, रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, लोणी काळभोर पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील आरोपीचा गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ समांतर तपास करीत होते. त्यावेळी सहायक फौजदार उदय काळभोर व पोलीस नाईक शिवाजी जाधव यांना थेऊर फाटा येथे फरार आरोपी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला पुढील तपासासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.

अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, सहायक फौजदार उदय काळभोर, पोलीस अंमलदार मनोज खरपुडे, शिवाजी जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();