आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुण्यातील महिलेला ‘दिवाळी पहाट’ पडली साडेचार लाखाला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 8, 2021

धनकवडीतील घटना : उघड्या दरवाजातून प्रवेश करीत सकाळी चोरट्याने साधला डाव

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : धनकवडी येथील गणेशनगरमध्ये दरवाजा उघडा ठेवून दिवाळी पहाट कार्यक्रमाला जाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. सकाळच्या वेळी उघड्या दरवाजातून प्रवेश करुन लक्ष्मीपूजनासाठी देवघरात ठेवलेले साडेचार लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले. धनकवडीतील गणेशनगरमध्ये शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.

सहकारनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हे पहिल्या मजल्यावर राहतात. त्यांनी लक्ष्मीपूजनासाठी देवघरात १८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व १० हजार रुपये रोख ठेवले होते. त्यांची पत्नी सकाळी उठून दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी गेली. जाताना तिने दरवाजा उघडा ठेवला होता. चोरट्याने उघड्या दरवाजातून आत प्रवेश करुन देवघरातील साडेचार लाख रुपयांचे दागिने व १० हजार रुपये रोख असा ऐवज चोरुन नेला.

get_footer();