आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चोरीचे सोने घेणाऱ्या सोनारासह घरफोडी करणारे दोघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 21, 2021

युनिट २ची कामगिरी : साडेनऊ लाखांचा ऐवज जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज

पुणे : घरफोडी करणाऱ्या दोघांना कात्रज (शेलार मळा) येथे युनिट-२च्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले, तसेच चोरीचे सोने घेणाऱ्या सोनारालाही बेड्या ठोकल्या. घरफोडीतील दोन्ही आरोपी सराईत असून, बारामती, अहमदनगर, श्रीगोंदा येथील १० गुन्ह्यांत फरार होते. आरोपींकडून साडेनऊ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

युवराज अर्जुन डोणे (वय २६), अविनाश अर्जुन डोणे (वय २१, दोघे रा. मु.पो. मिरजगाव, कवडेवस्ती, ता. कर्जत, जि. अहमदनगर), तर चोरीचे सोने घेणारा नीलेश कुंदनमल झाडमुथ्था (वय ३८, रा. डोंगरगण, ता. आष्टी, जि. बीड) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी युनिट-२चे पथक गस्तीवर होते. त्यावेळी कात्रज (शेलार मळा) येथे घरफोडी करणारे दोघे थांबले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार सापळा रचला, मात्र पोलिसांना पाहताच पळून जात असताना पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता १५ दिवसांपूर्वी घरफोडी केली असून, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत चार, लोणीकंद, नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत प्रत्येकी एक असे सात गुन्हे केल्याची कबुली दिली.

आरोपींकडून २०० ग्रॅम वजन सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, कटावणी, छन्नी, चाव्या असा एकूण नऊ लाख ४० हजार ५० रुपयांचा ऐवज जप्त केला असून, सोने खरेदी करणारा अहमदनगरमधील सोनार नीलेश कुंदनमल झाडमुथ्था याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन्ही आरोपी बारामती, अहमदनगर, श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दतील १० घरफोड्याच्या गुन्ह्यात फरार होते. आरोपी नंबरप्लेटला चिखल लावून, बंद घराची पाहणी करत बनावट चावी अन्यथा कटावणीने कडीकोयंडा उचकडून चोरी करत असल्याचे तपासात उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

   ही कारवाई, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराले, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, युनिट-२चे सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, सहायक पोलीस फौजदार यशवंत आंब्रे, पोलीस अंमलदार गजानन सोनुने, कादीर शेख, संजय जाधव, किशोर वग्गू, निखील जाधव, समीर पटेल, चंद्रकांत महाजन, उत्तम तारू, मितेश चोरमोले, गोपाल मदने, नामदेव रेणुसे, मोहसीन शेख,चेतन गोरे यांच्या पथकाने केली.
get_footer();