आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गांजाविक्री करणाऱ्या गडचिरोलीच्या तीन उच्चशिक्षित तरूणांना पुण्यात अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • June 19, 2023

11 लाख रूपये किंमतीचा 55 किलो गांजा जप्त

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे- चंदन नगर पोलिस स्टेशन हद्दीत, खराडी बायपास जवळ चंदननगर जवळ गांजा विक्रीसाठी तीन व्यक्ती येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती.

त्यानुसार टाकलेल्या छाप्यात गडचिरोली जिल्ह्यातल्या राम बैस, वय वर्ष 20, रा. रामपुरी वॉर्ड कॅम्प परिसर, निकेश पितांबर अनोले, वय वर्ष 22, रा. देसाईगंज आणि भंडारा जिल्ह्यातल्या ऋतिक टेंभुर्णे, वय वर्ष 21, रा. गौराळा तालुका लाखंदर या तिघा तरूणांना अटक करण्यात आली.
या तिघांकडून 11 लाख 14 हजार रूपये किंमतीचा 55 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. तसेच पन्नास हजार रूपये किंमतीचे तीन मोबाईल फोन, पाच प्रवासी बॅगा असा सुमारे साडे अकरा लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला. या तिघांविरोधात चंदननगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील कामगिरी अपर पोलिस आयुक्त,गुन्हे शाखा रामनाथ पोकळे, पोलिस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २ सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे,सहायक सहपोलिस घुले, पोलीस अंमलदार चेतन गायकवाड , संतोष देशपांडे, संदीप जाधव, रविंद्र रोकडे,महेश साळुंखे, साहिल सय्यद शेख, नितीन जगदाळे,अझीम शेख ,दिनेश बास्टेवाड यांनी पार पाडली.

get_footer();