आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तीन लाखांचे मेफेड्रॉन विकणारा ताब्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 14, 2021

अमली पदार्थ विरोधी पथक क्र. एकची कामगिरी : एकूण सव्वासहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अमली पदार्थ विरोधी पथक क्र. १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी ३,०६,९०० रुपये किमतीचा २० ग्रॅम ४६० मिलिग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमास सिंहगड पोलीस ठाणे हद्दीतून शिताफीने पकडून अटक केली असून, एकूण सव्वासहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


शनिवारी (११ सप्टेंबर) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास, सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक अमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखा हे स्टाफसह अमली पदार्थ गैरव्यवहाराच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पुणे वडगाव येथील वडगावकडून नवले ब्रिजकडे जाणाऱ्या सर्विस रोडवरील चैतन्य बिअर शॉपी दुकानासमोर शिवकृष्ण अपार्टमेंट समोरील सार्वजनिक रोडवर शम्स महम्मद अली झवेरी (वय ६०, रा. काशीमिरा, मिरा रोड ईस्ट, मुंबई) हा संशयितरीत्या मिळून आल्याने त्याची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यात ३,०६,९०० रुपये किमतीचे २० ग्रॅम ४६० मिलिग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, १५,००० रुपये किमतीचे दोन मोबाईल हॅण्डसेट, तीन लाखांची एक हुंडाई गेटझ कार, रोख १,१०० रुपये, असा एकूण ६,२३,००० रुपये किमतीचा ऐवज अनाधिकाराने, बेकायदा विक्रीकरिता जवळ बाळगताना मिळून आला आहे.

त्याच्याविरुधद्ध सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे हे करीत आहेत. नमुद आरोपीची १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.


सदरची उल्लेखनीय कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, प्रभारी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) भाग्यश्री नवटक्के, पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) लक्ष्मण बोराटे (अति कार्यभार) यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक- १, गुन्हे शाखा, पुणे शहरकडील पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे आणि पोलीस अंमलदार मनोज साळुंके, राहुल जोशी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, विशाल शिंदे, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे.

get_footer();