आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तंबाखू नियंत्रण कायदा प्रभावीपणे राबवावा

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue, Social • April 30, 2022

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर : सोलापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

सोलापूर : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनामुळे युवा वर्गामध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, ही बाब गंभीर आहे. सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था कोलमडत असून, हे थांबवण्यासाठी कोट्पा 2003 कायदा प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद व सोलापूर जिल्हा रुग्णालयाचा तंबाखू नियंत्रण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदिप राऊत, गणेश उगले अमित महाडिक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्याधिकारी जिया शेख म्हणाल्या की, कोट्पा 2003 अंतर्गत कलम 4 व 6 त्याची माहिती समाजामध्ये प्रसारित करण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कलम पाच आणि सात यांची माहिती विभागीय अधिकारी अभिजित संघही यांनी दिली.

डॉ. निलेश कोकरे म्हणाले की, तंबाखू नियंत्रण कक्ष यांच्या वतीने चालणाऱ्या उपक्रमाची माहिती प्रभावीपणे युवापिढीपर्यंत पोहोचविण्याची प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. विभागीय अधिकारी रंगनाथ जोशी यांनी सूत्रसंचालन केले. समुपदेशिका मंजुश्री मुळे यांनी आभार मानले.

get_footer();