आवृत्ती पुणे
← Back to Homepage

एकवीस एकरावरील नियोजित प्रकल्पाचे भूमीपुजन

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 8, 2022

भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा मातृभूमी प्रतिष्ठानचा संकल्प

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

बार्शी – ग्रामीण भागातील माणसे असो की खेळाडू असो त्यांच्यात टॅलेंट हे खचून भरलेले आहे. बार्शी हे खेळाच्या बाबतीत राज्यात अग्रेसर असलेले गाव आहे. बार्शी सारख्या तालुक्याच्या ठिकाणी मातृभूमी प्रतिष्ठानसारख्या ध्येयाने प्रेरीत होऊन काम करणाऱ्या संघटना आहेत. हे त्यांच भाग्य आहे.

मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या नियोजित क्रीडा संकुलातुन ग्रामीण भागातील मुलं-मुली आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळू लागतील त्यासाठी आमची राज्य व राष्ट्रीय स्तरावरील ओलंपिक संघटना भक्कमपणे आपल्या पाठीशी उभी राहून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य ओलंपिक असोसिएशनचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी दिली.

बार्शीच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने बार्शी-कुर्डूवाडी बायपास रोडवर लक्ष्याचीवाडी येथे एकविस एकर जमीन खरेदी केली आहे. त्याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांच्या पायाभरणी समारंभात शिरगावरक बोलत होते. यावेळी अर्जून पुरस्कार विजेते पै. काका पवार, ओलंपिक असो. हॉलिबॉलचे सदस्य सोपान कटके, कुराश फेडरेशनचे राष्ट्रीय खजिनदार शिवाजी साळुंखे, क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी, ओलंपिक असो.चे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र घुले, खो खो फेडरेशनचे सहसचिव चंद्रजित जाधव, उस्मानाबादच्या क्रीडा अधिकारी सारिका काळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव अविनाश सोलवट, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे आदी उपस्थित होते.

बार्शीला खेळाची मोठी परंपरा आहे. ती परंपरा पुढे चालू ठेवण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे. मातृभूमी प्रतिष्ठान ही मोठा विचार घेऊन काम करणारी संघटना आहे. मी याठिकाणी कांही देण्यासाठी आलो असलो तरी मी येथून मोठा विचार घेऊन जात आहे. अशा संस्था राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात निर्माण झाल्यास गावाची व राज्याची प्रगती होण्यास वेळ लागणार नाही असा आशावाद व्यक्त केला.

काका पवार म्हणाले की, मराठवाडा असो की बार्शी या ठिकाणी गुणवत्तेची खाण आहे. बार्शीतील खेळाडू हे सर्वच क्रीडा प्रकारात पुढे आहेत. मातृभूमीच्या या प्रकल्पामुळे खेळाला नक्कीच चांगले दिवस येतील असे सांगत मी मार्गदर्शन करण्यास केंव्हाही तयार असल्याचे ते म्हणाले.
अविनाश सोलवट यांनी विविध प्रकाराच्या खेळाचे नेतृत्व करणारे हे दिग्गज आज आपल्यात उपस्थित आहेत व हे आपले भाग्य असल्याचे आहे. याठिकाणी पुण्यातील बालेवाडी येथे असलेल्या संकुलाप्रमाणे भव्य असे विभागीय क्रीडा संकुल उभा करण्याचा मातृभुमीचा संकल्प असल्याचे सांगितले.

राजकमल हेड्डा यांनी प्रतिष्ठानच्या संपूर्ण कार्याचा आढावा सादर केला. अजित कुंकुलोळ यांनी अन्नपुर्णा योजनेची वाटचाल उपस्थितांना सांगतली. संतोष ठोंबरे यांनी प्रतिष्ठानच्यावतीने या एकवीस एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पाची माहिती दिली. सुत्र संचलन किरण गाढवे यांनी केले तर आभार मधुकर डोईफोडे यांनी मानले. यावेळी सर्व संचालक व सदस्य उपस्थित होते.

get_footer();