आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेणारे दोघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 18, 2021

वानवडी पोलिसांची कामगिरी : सरदार वल्लभभाई दवाखान्यासमोर घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत पळून गेलेल्या दोघांना अटक केली आहे. ही घटना कॅन्टोन्मेंटच्या सरदार वल्लभभाई पटेल दवाखान्यासमोर गोळीबार-स्वारगेट रस्त्यावर सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली होती.

अक्षय सुरेश उडणशिवे (वय २६, रा. लोहियानगर, पुणे), अजय रणजित शिंदे (वय २४, रा. गल्ली नं.४, लोहियानगर, गंज पेठ, पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहे. या प्रकरणी मिलिंद सरोदे (वय २४, रा. काळेपडळ, पुणे) यांनी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व त्याचा भाऊ मित्राला भेटण्यासाठी स्वारगेटला जात होते. त्यावेळी दुचाकीवरून दोघेजण जवळ आले आणि तू आमच्या गाडीला धडक दिल्याने आमच्या गाडीचे नुकसान झाले असून, पैसे मागू लागले. त्यावेळी फिर्यादीने फोन करण्यासाठी मोबाईल बाहेर काढला असता, आरोपींनी भावाचा २० हजार रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट जबरदस्तीने हिसाकवून घेऊन पळून गेले. वानवडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव पुढील तपास करीत आहेत.

get_footer();