आवृत्ती पुणे
← Back to Homepage

उंड्रीतील तरुणाला फोन-पे व पेटीएमद्वारे ७३ हजारांना गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 2, 2022

कोंढवा पोलिसांत फिर्याद : महंमदवाडीतील एनआयबीएम रोडवर घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : ॲमॅझोन कंपनीत पार्टटाईम जॉब असल्याचे सांगून फोन-पे व पेटीएम ॲप्लिकेशनद्वारे ७३ हजार ६०० रुपयांना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला. महंमदवाडीतील एनआयबीएम रोड येथे २२ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

किरण चिंचोले (वय २७, रा. उंड्री, ता. हवेली, जि. पुणे) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात मोबाईलधारक व बँकेचा खातेधारकावर गुन्हा फसवणुकीचा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीला अज्ञात मोबाईलधारकाने ॲमॅझोन कंपनीचा पार्टटाईम जॉब असल्याचे सांगून तशी ws088com/#/pages/frozen/index) अशी लिंक पाठविली. त्यानंतर फिर्यादीला बँकेच्या खात्यामधून व मोबाईलमधील फोन-पे व एटीएम ॲप्लिकेशनद्वारे एक रिचार्ज चार्ट पूर्ण करण्यास सांगून ७३ हजार ६०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली. कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर पुढील तपास करीत आहेत.

get_footer();