आवृत्ती पुणे
← Back to Homepage

समर्थ पोलीस स्टेशनचा अनोख्या पद्धतीचा दसरा!

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 18, 2021

संपूर्ण हद्दीत सायकल व पायी पेट्रोलिंग : विविध ठिकाणी जाऊन दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : समर्थ पोलीस स्टेशनने ठाण्याच्या संपूर्ण हद्दीत सायकल व पायी पेट्रोलिंग करून दसरा अनोख्या पद्धतीने साजरा केला. तसेच हद्दीत विविध ठिकाणी जाऊन नागरिकांना शुभेच्छाही दिल्या.

समर्थ पोलीस ठाण्याकडून नेहमीच नवीन नवीन उपक्रम राबविले जातात. विजयादशमीनिमित्त समर्थ पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व बिट मार्शल तसेच महिला अंमलदार यांनी समर्थ पोलीस ठाणे संपूर्ण हद्दीत सायकल व पायी पेट्रोलिंग केले. या दरम्यान त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील व्यापारी संकुल, नागरिक, रिक्षा स्टॅन्ड, धान्य बाजार या ठिकाणी जाऊन तेथील नागरिकांना दसऱ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी इंद्रप्रस्थ येथील व्यापारी संकुलचे राजेश परमार यांनी ‘अशा प्रकारचा पोलिसांकडून अनुभव आम्हा व्यापाऱ्यांना प्रथमच येत असून यामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना वाढीस लागण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याचप्रमाणे राज रानावत यांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करून त्यांना स्वतः व नागरिकांना अशाप्रकारचा अनुभव प्रथमच येत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. रिक्षाचालक व धान्य व्यापारी हेसुद्धा पोलिसांनी दिलेल्या शुभेच्छा व राबविलेल्या उपक्रमामुळे भारावून गेले. त्याच प्रमाणेच पोलीस ठाण्यामध्येदेखील येणाऱ्या नागरिकांना दसऱ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.

पोलीस व नागरिकांशी सुसंवाद वाढावा सुरक्षिततेची भावना नागरिकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व सर्व पोलीस अंमलदार व महिला अंमलदार हे नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. त्याच प्रमाणे पोलीस ठाण्यामध्येदेखील येणाऱ्या नागरिकांना व पोलीस अंमलदार यांना दसऱ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.

या माध्यमातून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, पोलीस जनता संबंध सुधारावे, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, यासाठी सदरचा उपक्रम राबविण्यात आला आहे.

विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर

get_footer();