आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 20, 2021

चंदननगर पोलिसांत फिर्याद दाखल : नागपाल रोड सोसायटीसमोर घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : ज्येष्ठ नागरिक सायकलवर जात असताना अज्ञात वाहनाची धडक बसून ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना चंदननगरमधील नागपाल रोड सोसायटीसमोरील रस्त्यावर १६ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

उत्तम सुदाम यंकुळे (वय ६५, रा. चौधरीवस्ती, खराडी, पुणे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे नाव आहे. या प्रकरणी संदीप यंकुळे (वय ३०, रा. चौधरीवस्ती, कृष्ण मंदिराजवळ, खराडी, पुणे) यांनी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचे वडिल उत्तम यंकुळे चंदननगरमधील नागपाल रोड सोसायटीसमोरील रस्त्याने सायकलवर जात होते. त्यावेळी अज्ञात वाहनचालकाची धडक बसून अपघात झाला. या अपघातात यंकुळे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला. चंदननगर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार गांगुर्डे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();