आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाळू व्यावसायिक संतोष जगतापचे खुनी ३० तासांत जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 25, 2021

गुन्हे शाखेच्या युनिट-६ची कामगिरी : उरुळीकांचन येथे भरदिवसा केला होता गोळीबार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : उरळी कांचन येथील हॉटेल सोनाईसमोर वाळू व्यावसायिक संतोष जगताप यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, तर अंगरक्षक गंभीर जखमी झाला होता. त्याबाबत लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये २२/१०/२०२१ रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हयाच्या समांतर तपासाची चक्रे गुन्हे शाखेमार्फत सुरू झाली. पोलिसांनी अवघ्या ३० तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

पवन गोरख मिसाळ (वय २९, व्यवसाय- खडी सप्लायर, रा. दत्तवाडी, उरळी कांचन, हवेली, जि. पुणे), महादेव बाळासाहेब आदलिगे (वय-२६, व्यवसाय- शेती. रा जुनी तांबे वस्ती, दत्तवाडी उरुळीकांचन, हवेली, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर, रामनाथ पोकळे यांना आरोपीचे ठिकाणाविषयी माहिती मिळाली. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट ६ चे अधिकारी यांना माहिती देवून पथक नेमून आरोपीचा शोध घेणेबाबत सांगितले. त्यानुसार तपास पथकासह घटनास्थळी जाऊन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास चालू आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेगले, पोलीस अमलदार मच्छिंद्र पाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन घाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();