आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाळू व्यावसायिकाच्या खूनातील मुख्य सूत्रधार सोनवणे अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 1, 2021

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई : न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) येथे वाळू व्यावसायिक संतोष जगताप याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यात जगताप जागीच ठार झाला, तर 2 अंगरक्षक गंभीर जखमी झाले होते. प्रत्युत्तरादाखल जगताप याच्या अंगरक्षकांनी गोळीबार केला. त्यात एक हल्लेखोर जागीच ठार झाला. तसेच इतर पळून गेले होते. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सुत्रधार उमेश सोपान सोनवणे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोणी काळभोर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुख्य सुत्रधार उमेश सोनवणे यास अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली आहे. दरम्यान, त्यापैकी पवन मिसाळ आणि महादेव आदलिंग या दोघांना पळसदेव (ता. इंदापूर) येथून अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहिती वरून या हल्ल्यात मुख्य सूत्रधार उमेश सोनवणे असल्याचा खुलासा झाला होता. मात्र, तो हाती लागला नव्हता. यावर वरिष्ठ पीआय मोकाशी यांनी सोनवणे याला पकडण्यासाठी तपास पथकास सूचना दिल्या.

तसेच, त्यांनी पथकासह तेथे सापळा रचून त्यास अटक करण्याच्या सूचना दिल्या. यावर पथकासह राजू महानोर तेथे पोहोचले व मिळालेल्या माहितीनुसार उमेश सोनवणे तेथे आला असता पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, अमित गोरे, नितीन गायकवाड, गणेश सातपुते, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत, संभाजी देविकर, बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे, दिगंबर साळुंके यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();