आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाढदिवसाच्या केक, पार्टीला फाट देत राबविले रक्तदान शिबिर

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue, Social • January 6, 2022

अजय भोकरे यांचा संकल्प : सुमारे ७० रक्तदात्यांनी केले रक्तदान

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : केक, पार्टी या पाश्चात्य संस्कृतीला फाटा देत कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर घेतले. या शिबिरामध्ये ७० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रुग्णांवर उपचार करताना रक्ताची मदत होईल, या भावनेतून अजय भोकरे यांनी आगळा वेगळा उपक्रम घेतल्याचे सांगितले.

सुखसागर नगरमध्ये बुधवारी (दि. ५ जानेवारी २०२२) कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून तिसरी लाट येते की काय या पार्श्वभूमीवर भोकरे यांनी 38वा वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत शासनाने घालून दिलेल्या नियमात रक्तदान शिबिर घेतले. रक्तदान शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सिम्बॉयोसिस रक्तपेढीचे सहकार्य लाभले.

याप्रसंगी सुखसागर नगर येथील जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, पत्रकार मित्र परिवार, सुखसागर रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, भाजपा पुणे सरचिटणीस गणेश घोष, उपाध्यक्ष पिंटू धाडवे, चेतन टिळेकर, तुषार कदम, राष्ट्रवादीचे सरचिटणीस गणेश मोहिते, प्रशांत दिवेकर, रवि धुमाळ, भाजपा उपाध्यक्ष निहल घोडके, चिटणीस चंद्रकांत पोटे, दिपक पालवे, उद्योजक प्रमोद शेठ मित्र परिवार, अजित गारड, खोपडे, तरंगे, संतोष लड्डा, विठ्ठल वरुडे, विठ्ठल घोगरे, व बिबवे परिवार, सचिन आयवळे, संजय वाघमारे, नवनाथ पालवे, नितीन मोरे, दादा शितोळे उपस्थित होते.

get_footer();