आवृत्ती पुणे
← Back to Homepage

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 15, 2021

कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल : शिवीगाळ करुन मारहाण

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : ओळखीचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने शारीरीक संबंध करीत असलेला व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 23 जानेवारी 2019 ते 8 एप्रिल 2021 दरम्यान कोंढवा तसेच वडगाव शेरी येथील सैनिकवाडीतील आरोपीच्या घरी घडला आहे.

कोंढवा पोलिसांनी ऑलविन एडवर्ड डेव्हिड (वय 35, रा. सैनिकवाडी, वडगाव शेरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कोंढवा येथे राहणार्‍या एका महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. फिर्यादी या आरोपीच्या घरी गेल्या असताना दोघांमध्ये शारिरीक संबंध झाले. त्यावेळी संबंध करताना नकळत आरोपीने व्हिडीओ काढले व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने वारंवार पिडीतेवर बलात्कार केला. फिर्यादीला शिवीगाळ करुन मारहाण केली. बदनामीच्या भितीने फिर्यादीने ही बाब कोणाला सांगितली नाही. मात्र, त्याच्या अत्याचाराला कंटाळून शेवटी या महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

get_footer();