आवृत्ती पुणे
← Back to Homepage

विद्यार्थ्यांना वाचनाची आवड होण्यासाठी दिली १०० पुस्तके

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue, Social • February 23, 2022

अमोल काटे : बिबवेवाडीमध्ये शिवजयंतीनिमित्त जाणिव फाउंडेशनचा उपक्रम

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अलीकडे सोशल मीडिया, दूरचित्रवाणीमुळे वाचनाची आवड कमी होऊ लागली आहे. मात्र, विद्यार्थीदशेमध्ये वाचनाची आवड असली पाहिजे. पुस्तक आपला चांगला मित्र आहे, या भावनेतून विद्यार्थ्यांना १०० पुस्तके दिल्याचे जाणिव फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल काटे यांनी सांगितले.

बालशिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बिबवेवाडीतील अंकुश मित्र मंडळ, सद्गुरू उपासना केंद्र, जाणीव फाऊंडेशन, पार्वती महिला बचत गट, ओंकार प्रतिष्ठान, जिजाऊ फाऊंडेशन या संस्थांनी या शिवजयंती उपक्रमात सहभाग घेतला होता. जाणीव फाऊंडेशनने 100 पुस्तके देऊन इतिहास वाचनाला प्रोत्साहन दिले. संस्थेने आजपर्यंत वेगवेगळ्या प्रबोधन व सामाजिक विषयांची पंधरा हजार पुस्तके मोफत देण्याचा उपक्रम सुरू ठेवला आहे. अमोल काटे या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

ज्येष्ठ कवी म. भा. चव्हाण, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, दीपा परब, सरहदच्या गीता खोत, गझलकारा अमृता जोशी, युवानेते संतोष शेलार, राजेंद्र फरांदे, स्वरगंधार सामजिक व सांस्कृतिक विभाग अध्यक्ष मयूर मसूरकर, नगरसेवक बंडू नलावडे, शिवसेना शहर संघटक शशिकांत पापळ, संदीप काळे, प्रभागप्रमुख गणेश हंबीर, किरण साबळे, शशी धनवट, पिंटू पावटकर, विश्र्वास जाधव, जिजाऊच्या नम्रता हंबीर, ओंकार कांबळे, वैभव वांढरे, राजेश थोपटे, गडझुंजार मावळे प्रतिष्ठानचे अनेक सदस्य उपस्थित होते. यावेळी बालव्याख्याता मृणाल मयूर मसुरकर हिने शिवरायांच्या लढाई आणि राज्यकारभाराचा इतिहास जागवला.

अमोल काटे यांनी सूत्रसंचालन केले. कवी गोपाळ कांबळे यांनी प्रास्ताविक केले.

get_footer();