आवृत्ती पुणे
← Back to Homepage

विष्णू टोळीतील खंडणी मागणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 15, 2021

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई : जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागत होते

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मोक्कातील आरोपी विष्णू टोळीतील नंबरकारी असल्याचे सांगून जीवे मारण्याची धमकी देत दोन लाख रुपये खंडणी मागणाऱ्या दोघांच्या लोणी काळभोर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. विष्णू टोळीतील नंबरकारी असल्याचे सांगून ४ ते ११ डिसेंबर २०२१ दरम्यान खंडणी मागण्याच्या प्रकरणाची तक्रार पोलिसांत केली होती.

राजू गायकवाड (रा. शिंदावणे, ता. हवेली, जि. पुणे) व घनश्याम ऊर्फ गणेश आत्माराम शिंदे (रा. कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. अण्णासाहेब तानाजी खलसे (रा. कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली, त्यानुसार विष्णू टोळीतील दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, खलसे दुग्धव्यावसायिक असून, त्यांचा भाऊ राजू गायकवाड (रा. शिंदावणे, ता. हवेली, जि. पुणे) व घनश्याम ऊर्फ गणेश आत्माराम शिंदे (रा. कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी मोक्कातील आरोपी विष्णू जाधव याचे नंबरकारी असल्याचे सांगून जीवे मारण्याची धमकी देत दोन लाख रुपये खंडणीची मागणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांनी तपास पथकाच्या मदतीने दोन्ही आरोपीला सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर करीत आहेत.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत, संभाजी देवीकर, पोलीस शिपाई बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();