आवृत्ती पुणे
← Back to Homepage

व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचा सपासप वार करुन खून

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 30, 2021

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : आंबेगाव बुद्रुकमधील नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडवर घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कर्जाऊ दिलेल्या पैशाचे व्याज न दिल्याने झालेल्या वादातून दोघांनी एका तरुणावर सपासप वार करुन त्याचा खून केला. हा प्रकार कात्रज-सिंहगडरोड दरम्यानच्या नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडवर रात्री साडेअकरा वाजता घडला.

शरद शिवाजी आवारे (वय ४३, रा. संभाजीनगर, धनकवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र प्रशांत महादेव कदम (वय ३७, रा. धनकवडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रकाश शिंदे व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, शरद आवारे यांनी प्रकाश शिंदे याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्याचे व्याज शरद दर महिन्याला देत होता. मात्र, या महिन्यात त्याने व्याज दिले नाही. त्यामुळे प्रकाश शिंदे याने शरद आवारे याला कात्रज रोडवरील चंद्रसखा वेअरहाऊसजवळ बोलावले होते. तेथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. तेव्हा चिडलेल्या प्रकाश शिंदे व त्याच्या साथीदाराने धारदार हत्याराने शरद याच्यावर सपासप वार केले व ते पळून गेले. जखमी अवस्थेत शरद याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

get_footer();