आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाटसरूंना लुटणाऱ्या दोन सराईतांना केले जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 16, 2022

खडकी पोलिसांची कामगिरी : दोन रिक्षा, दुचाकी असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : रस्त्याने दुचाकीवरून जाणाऱ्यांना, वाटसरूंना अडवून पैसे, मोबाईल फोन आणि वाहन चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना खडकी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन रिक्षा, दुचाकी असा एकूण चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता खडकी पोलिसांनी व्यक्त केली आहे. मैलापाणी शुद्धीकरण केंद्राच्या कंपाउंडमध्ये पोलिसांनी चोरट्यांना पकडले.

अमोल संजय भोसले (वय २१, रा. शितोळे नगर, जुनी सांगवी), विक्रांत उर्फ पापड मनोज आल्हाट (वय २५, रा. मुळा हाऊस खडकी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी तुषार अरुण शिंदे (वय १८, रा. नागरस रोड, औंध) याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हे २ फेब्रुवारी रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास जुना पुणे-मुंबई रोडने अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून जात होते. पाठिमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांची दुचाकी फिर्यादी यांच्या दुचाकीला आडवी घालून कोयत्याचा धाक दाखवून दुचाकी चोरून नेली. या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी स्वागत हॉटेल समोरील मैलापाणी शुद्धीकरण केंद्राच्या कंपाउंडमध्ये बसल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याकडून पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सांगवी आणि भोसरी पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांसह खडकी पोलीस ठाण्यातील सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून दोन रिक्षा, 6 दुचाकी असा एकूण 4 लाख 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त रमेश गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन साळवी, तानाजी कांबळे, पोलीस नाईक उद्धव कलंदर, संदेश निकाळजे, राजकिरण पवार, पोलीस शिपाई अनिरुद्ध सोनवणे, भगवान हंबर्डे, जहांगिर पठाण, स्वप्निल घोलप, विलास शेवाळे, सनी नांद्रे, साईनाथ म्हस्के यांनी केली.

get_footer();