आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाटसरूंना लुटणारी टोळी जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 1, 2021

पुणे शहर युनिट एक गुन्हे शाखेची कामगिरी : एकूण दहा गुन्हे उघडकीस

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पीएमपीएमल बसमध्ये चोऱ्या करणारी व कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी अंधाराचा फायदा घेऊन रस्त्याने पायी जाणाऱ्या तसेच मोटार सायकलवरून जाणाऱ्यांना थांबवून त्यांना घातक हत्याराचा धाक दाखवून लुटणारी टोळी जेरबंद करण्यात पुणे शहर युनिट एक गुन्हे शाखेस यश मिळाले असून, एकूण दहा गुन्हे उघडकीस आणले आहेत.

दिनांक २९ सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी आणि स्टाफ असे कार्यालयात हजर असताना पोलीस अंमलदार अनिकेत बाबर व दत्ता सोनावणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत रात्री पावणेअकरा वाजताच्या सुमारास बातमी मिळाली की, पॅगो रिक्षामधून मोहन जाधव, शीतल वाडेकर व त्याचे साथीदार (सर्व रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे) हे रात्रीच्या वेळी बाहेर पडतात व एकांत ठिकाणाचे अंधाराचा फायदा घेऊन रस्त्याने पायी जाणाऱ्या तसेच मोटारसायकलवरून जाणाऱ्यांना थांबवून त्यांना घातक हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडील पैसे व अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावुन तसेच महिलांच्या हातातील बांगड्या कट करून गुन्हे करतात व आता पूर्ण तयारीनिशी दरोड्याचा गुन्हा करण्यासाठी पुणे शहरात फिरत असून ते डेक्कन चौपटीजवळच्या नदीपात्रलगत जाणार आहेत, अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्याप्रमाणे कार्यवाही करण्याकरीता युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले.

पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे मिळालेल्या पॅगो रिक्षाचा डेक्कन चौपटीजवळच्या नदी पात्रात गुप्तपणे सापळा लावून गुप्तपणे पाहणी करता सदर पॅगो रिक्षामधून काही इसम व महिला असे येऊन ओंकारेश्वर मंदिराच्या मागील भिंतीलगत शनिवार पेठ पुणे येथे रिक्षा पार्क करून तेथे आडबाजूस संशयितरित्या एकत्र जमून आपसात चर्चा करीत असताना दिसले. बातमीप्रमाणे खात्री होताच रात्री बारा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकून सदर इसमांना व महिलांना जागीच पकडून त्यांना आहे त्या स्थितीत थांबण्यास सांगून त्यांना ताब्या घेतले.

अरुण शिवाजी गायकवाड (वय ३८), मोहन गणेश जाधव (वय ३०), शिवराज अर्जुन वाडेकर (वय २२), प्रशांत मिठु थोरबोले (वय २२), शीतल श्रीनिवास वाडेकर (वय २९) आणि भीमबाई रमेश बजंत्री (वय ४५, सर्व रा. आनंदनगर, सर्वोदय कॉलनी, मुंढवा पुणे) अशी त्यांची नावे असून, सर्व गुन्हेगार हे दरोडा घालण्याचे तयारीत असताना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध पोलीस अंमलदार राहुल देवराम मखरे यांनी तक्रार दिल्याने नमूद गुन्हेगाराविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

नमूद गुन्हेगारांकडे तपास करता, सदर आरोपीनी विश्रामबाग पोलीस ठाणे कडील तीन, डेक्कन पोलीस ठाणे आणि दत्तवाडी पोलीस ठाणेकडील प्रत्येकी दोन, शिवाजीनगर पोलीस ठाणे, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, कोथरुड पोलीस ठाणेकडील प्रत्येकी एक गुन्हा असे चोरीचे एकूण दहा गुन्हे केल्याचे कबूल केलेले आहे.

यातील महिला गुन्हेगार शीतल श्रीनिवास वाडेकर हिच्या विरुद्ध मुंढवा बंडगार्डन, डेक्कन, स्वारगेट, बिबवे वाडी व वारजे माळवाडी इत्यादी पोलीस ठाण्यात ११ गुन्हे दाखल आहेत, तर गुन्हेगार मोहन गणेश जाधव याचे विरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगिरी ही, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) भाग्यश्री नवटके, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एककडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, राहुल मखरे, विजेसिंग वसावे, महेश बामगुडे, इम्रान शेख, अजय थोरात, अमोल पवार, अशोक माने, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर, मिना पिजंण, रुक्साना नदाफ यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी हे करीत आहेत.

get_footer();