आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पत्नीसह सासू, मेहुण्यांच्या मारहाणीत निवृत्त सैनिकाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 26, 2022

विमानतळ पोलिसांत फिर्याद : शवविच्छेदन अहवालात बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याचे स्पष्ट

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : लोहगावमध्ये पत्नीला मारहाण केल्यामुळे पत्नीसह सासू, मेहुण्यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने निवृत्त सैनिकाचा मृत्यू झाला. ही घटना विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत 11 जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी पत्नीसह सासू आणि मेहुण्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रमोद रघुनाथ जाधव (वय 39) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी सांगितले की, मृत प्रमोद जाधव हे सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. लोहगाव परिसरात पत्नी आणि 2 मुलांसह ते राहत होते. प्रमोद जाधव यांना दारूचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर तो पत्नीला मारहाण करायचा. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती.

दरम्यान, 11 जानेवारी रोजी मुलांच्या शाळेसंदर्भातील काही कागदपत्रे घेण्यासाठी पत्नी लोहगावमधील घरी आली होती. यावेळी पुन्हा पती-पत्नीत वाद झाला. त्यावेळी प्रमोदने पत्नीला बेदम मारहाण केली. मारहाणीत तिला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात प्रमोदची सासू आणि 2 मेहुणे आले. त्यानंतर या सगळ्यांनी घरी जाऊन प्रमोद यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि निघून गेले. प्रमोद हा गेली दोन दिवस घराबाहेर पडला नव्हता. त्यानंतर तो घरातच मृतावस्थेत आढळून आला. शवविच्छेदन अहवालात बेदम मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी अधिक तपास विमानतळ पोलिस करीत आहेत.

get_footer();