आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पत्नीचा खून करून फरार पतीला २४ तासांत केले जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 17, 2022

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : किरकोळ कारणावरून भांडण झाल्याने केली होती जबर मारहाण

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पत्नीचा खून करून फरारी झालेल्या पतीला २४ तासांत पकडून अटक केली. न्यायालयाने त्याला २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सोलापूर तालुका पोलिसांनी ही दमदार कामगिरी केली.

मैनोद्दिन अब्बास शेख (वय ७१, रा. कळमण, ता. उत्तर सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव असून, त्याने पत्नी लशिफा मैवोदी मौजे कळमण (ता. उत्तर सोलापूर) हिचा खून केला होता. याप्रकरणी यासमिन समीर शेख यांनी सोलापूर तालुका, पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.

पोलिसांनी सांगितले की, पत्नीबरोबर किरकोळ भांडण झाल्याने लोखंडी खुर्ची तिच्या डोक्यात घालून लाकडी बांदुने गंभीर दुखापत करून ठार मारले. सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्याच दिवशी सूचना देऊन तपास सुरू केला. दरम्यान, बार्शी, वैराग व तुळजापूर परिसरात गुन्हेगाराचा तपास सुरू असताना सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यानुसार फरार आरोपी बार्शी शहराच्या परिसरात आहे. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये हजर करून अटक केले. सोलापूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २० जानेवारी २०२२ पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बेताजी बंडगर करीत आहेत.

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अगोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी अरुण फुगे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस उपनिरीक्षक दिपक दब्बी, सहायक पोलीस फौजदार विवेक साजेकर, पोलीस हवालदार संजय देवकर, पोलीस नाईक बाकु चमके, श्रीराम आदलिंग, अतुल शिंदे, रविंद्र सावळे, सिद्धू विराजदार, बार्शी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण, सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टोबल रवि हाटकिले व रतन जायव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();