आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणारा अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 10, 2021

येरवड्यातील चंद्रमा चौकात घडली घटना : थकित दंड भरल्याच्या रागातून घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनावर असलेला थकित दंड भरण्यास सांगणाऱ्या महिला वाहतुक पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून, शिवीगाळ करण्याचा प्रकार वाहन चालकाने केला. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्यास अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यासह कार वेगात नेली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी वाहन चालकास अटक केली.

वैभव हरिश्‍चंद्र जंगम (तळवदे, महाबळेश्‍वर, सातारा) असे अटक केलेल्या वाहनचालकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी येरवडा वाहतुक विभागातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी बुधवारी (दि. ८) दुपारी बाराच्या सुमारास येरवडा येथील चंद्रमा चौकात वाहतुक नियमन व कारवाई करीत होत्या. त्यावेळी जंगम हा त्याच्या ताब्यातील कार घेऊन खडकीहून येरवड्याच्या दिशेने जात होता. चौकात आल्यानंतर फिर्यादींनी त्याच्या कारचे छायाचित्र ई-चालान मशीनवर घेऊन त्याची माहिती घेतली, त्यावेळी वाहनाचा विमा व फिटनेसची वैधता संपल्याचे निदर्शनास आले. त्यावर 600 रुपयांचा दंड प्रलंबित असल्याचे दिसल्याने फिर्यादीने त्यास कार बाजुला घेण्यास सांगितले. त्यावेळी जंगम याने कार न थांबविता भरधाव वेगाने निघून गेला. फिर्यादीने संबंधीत वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार बाराशे रुपयांची दंडाची रक्कम संबंधीत चालकाच्या नावावर टाकली.

त्यानंतर कारचालक जंगम हा फिरून फिर्यादीकडे आला. त्याने फिर्यादीस ओरडून, अपशब्द वापरुन “तुला कोणी अधिकार दिला, माझ्या गाडीवर पावती टाकण्याचा आणि पावती कशाबद्दल टाकली ते सांग’ अशा शब्दात धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीने त्यास कारसह येरवडा वाहतुक विभागात आणले, तेव्हा, जंगम हा पुन्हा कार घेऊन तेथून पळून जावू लागला. त्यावेळी फिर्यादी त्याला अडविण्यासाठी गाडीमध्ये बसल्या. तेव्हा जंगम याने गाडी न थांबविता, पुन्हा चंद्रमा चौक, आंबेडकर चौक, चंद्रमा चौकापर्यंत नेली.

get_footer();