आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महिलांनी घेतला मनोरंजक खेळाचा आंनद !

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 8, 2022

गोरक्षस्मृती फाउंडेशन तर्फे खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे केले होते आयोजन

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कात्रज-कोंढवा रोड येथील दिपवंदन कार्यालय येथे गोरक्षस्मृती फाउंडेशन तर्फे माजी सरपंच व्यंकोजी खोपडे यांच्या पुढाकाराने खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे उदघाटन नगरसेविका अमृता बाबर यांच्या हस्ते करण्यात आले.

सिनेअभिनेता क्रांती मळेगावकर यांनी संगीतमय निवेदन करत मनोरंजक खेळ, गप्पा-गोष्टी, प्रश्नोत्तरे व हिंदी-मराठी गीतांवर धम्माल मस्तीचा आनंद महिलांना दिला. या खेळात उत्तम प्रदर्शन करणाऱ्या तीन महिलांचा पैठणी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सहभागी महिलांना बक्षिसे देण्यात आले.

त्यामुळे कोरोना संकटात दडपणात घरा बाहेर न पडू शकणाऱ्या महिलांनी समाधान व्यक्त केले. यावेळी नाणी खोपडे, वर्षा मांगडे, मनिषा कोपनर, वैजियंती निंबाळकर, दीपा धुत, प्रज्ञा हरिभक्त, ज्योती मांगडे, संगीता काळे, अलका खोपडे, नम्रता खोपडे, वासंती खोपडे, अश्विनी कदम ,सारिका पवार, सारिका घाटे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

get_footer();