आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वानवडीमध्ये जलवाहिनीच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 8, 2021

वाहतूकचे पोलीस उपायुक्त श्रीरामे : पर्यायी रस्त्यांचा वाहनचालकांनी अवलंब करावा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

वानवडी भागामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असल्याने ६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२१ दरम्यान वाहतुकीत बदल केला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

१) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने जलवाहिनी टाकण्याकरिता रेसकोर्स गेट (जॉगिंग ग्राउंडकरिता वापरण्यात येणारे) ते रेसकोर्स मेन गेटपर्यंतचा रस्ता, २) घड्याळ चौक, आर्मी पब्लिक स्कूल चौक व एम्प्रेस नाक्याकडून रेसकोर्स मेन गेटमार्गे कॅम्प-पुणे शहराकडे जणाऱ्या रस्त्याऐवजी सोपानबाग भागातील नागरिकांनी रेसकोर्स मार्गे न जाता कॅम्प-पुणे शहरात जाण्यासाठी भैरोबानाला मार्गाचा वापर करावा.


तसेच ३) कॅम्प-पुणे शहर परिसरातून रेसकोर्स मेन गेटमार्गे घड्याळ चौक, आर्मी पब्लिक स्कूल चौक व एम्प्रेस नाक्याकडून जाणाऱ्या रस्त्याचा वापर करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्ग क्र.१- पुणे शहरातून कॅम्प मार्गे खाण्या मारुती चौक, मम्मादेवी चौक व पुढे भैरोबानाला मार्गाच्या रस्त्याचा वापर करावा. तसेच पर्याय क्र.२ रेसकोर्स मेन गेटजवळून उजव्या बाजूने पाण्याच्या टाकीकडून डाव्या बाजूने टर्फ क्लब चौकातून भैरोबानाला चौक रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

get_footer();