आवृत्ती पुणे
← Back to Homepage

येरवड्यात दुकानदारांना लुटणाऱ्या फरारीच्या मुसक्या आवळल्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 22, 2021

दरोडा व वाहनचोरीविरोधी पथक-२ची कामगिरी : पुढील कार्यवाहीसाठी येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत दुकानदाराला मारहाण करून लुटणारे टोळीतील फरारी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ने ही कारवाई केली.

निखील संतोष मिसळ (रा. राजगे आळी, मुंढवा, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलीस हवालदार राजेश लोखंडे, दिनकर लोखंडे, विनायक रामाणे, शाकीर खान, पोलीस नाईक, गणेश लोखंडे, सुदेश सपकाळ येरवडा पोलीस स्टेशन व मुंढवा पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात गस्त करीत होते.

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि.नं. 533/2021 भादवि क.395,143,147,148,149 व आर्म अक्ट कलम 3(25) 4(25) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) सह १३७ गुन्ह्यातील फरारी आरोपी कल्याणीनगर गोल्ड अँड लॅब थिएटर येथील पान टपरीजवळ थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार घटनास्थळी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.

get_footer();