आवृत्ती पुणे
← Back to Homepage

येरवड्यात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 15, 2021

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याला अपघात झाला. या अपघातात पादचारी तरूण गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात १२ सप्टेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास येरवड्यातील सिद्धार्थनगर समोरील रस्त्यावर घडला.

सुभाष सुरेश जाधव (वय ३१, रा. आनंदवाडी, लातूर) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अमंलदार कपील भाकरे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष मूळचा लातूरमधील आनंदवाडीचा होता. कामानिमित्त तो येरवड्यात राहत होता. १२ सप्टेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास सुभाष सिद्धार्थनगर समोरील रस्त्यावरून जात असताना, अज्ञात वाहन चालकाने त्याला धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सुभाषचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील तपास करीत आहेत.

get_footer();