आवृत्ती पुणे
← Back to Homepage

येवलेवाडीतील हुक्का पार्लरच्या गोदामातून 22 लाखाचा माल जप्त

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 16, 2021

पोलिसांनी तिघांना केले जेरबंद : राज्य शासनाचा आदेश धुडकावून केली होती साठवणूक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : राज्य शासनाने हुक्का पार्लर तसेच हुक्का साहित्याची विक्री करण्यास बंदी घातली आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी कोंढवाजवळील येवलेवाडीमधील हुक्का साहित्याच्या गोदामावर छापा टाकून 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

शहेजाद अश्रफ रंगुनवाला (वय 37), नावेद मुन्ने खान (वय 21), शफीक महंमद मालापुरी (वय 18, तिघे रा. लेक डिस्ट्रीक्ट सोसायटी, येवलेवाडी, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, येवलेवाडी परिसरातील एका सोसायटीच्या परिसरात तळमजल्यावरील गोदामात हुक्का साहित्य तसेच सुगंधी तंबाखुची साठवणूक करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य, सुगंधी सुपारी असा एकूण 22 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

get_footer();