आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अखिल भारतीय गुगळे- गुगलिया परिवाराचे शानदार स्नेहसंमेलन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News Slider, Other, People, Social • February 29, 2024
Spread the love

पुणे : राष्ट्रसंत प. पू. आचार्य सम्राट आनंदऋषीजी म. सा. च्या पवित्र जन्मभूमी शिराळ-चिचोंडी, ता.पाथर्डी येथे अखिल भारतीय गुगळे-गुगलिया परिवाराचे शानदार संमेलन संपन्न झाले. ७५०-८०० लोकांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हे एक ऐतिहासिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.

या संमेलनात सहभागी होण्यासाठी हैदराबाद, चेन्नई, बेंगलोर, वापी, पुणे, नासिक, अहमदनगर, संभाजीनगर, बीड अश्या वेगवेगळ्या गावाहून गुगळे परिवाराचे सदस्य आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात प. पू. लोकेश ऋषीजी म. सा. यांच्या मंगल वाणीने होऊन त्यांनी सर्वांना शुभार्शिवाद दिले. कार्यक्रमाची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन तिलोत्तमा ललित गुगळे यांनी केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी संघटनेची आवश्यकता यावर आपले विचार मांडले.

त्यानंतर रविंद्र गुगळे ज्यांनी अखंड मेहनत करुन हा अखिल भारतीय गुगळे परिवाराचा ग्रुप बनवून या आगळ्यावेगळ्या संमेलनाचे आयोजन केले. त्यांनी समाजात संघटनेचे महत्व विशद करुन संघटनेच्या काही सामाजिक प्रकल्पांची विस्तृत माहिती दिली.

उपाध्याय प्रवर अर्हम विज्जा प्रणेता प. पू. प्रवीणऋषीजी म. सा. यांनी प्रत्यक्ष प्रक्षेपणाद्वारे सर्वांना आशिर्वाद व संमेलनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. गोकुळ गुगळे यांनी जीवनात ध्यानाचे महत्त्व सांगितले. प्रदीप गुगळे यांनी गुगळे कुळाच्या इतिहासाची माहिती दिली.

आनंदतीर्थचे मॅनेजर संजय गुगळे यांनी आनंदतीर्थची माहिती दिली. या समारोहात समाजातील अनेक प्रतिष्ठित व मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

रमेश गुगळे (जामखेड), हर्षद गुगलिया (वापी), अनिल मेहेर (अहमदनगर), सतिश गुगळे (पाथर्डी), श्रृती गुगळे, राजश्री गुगळे (पुणे), संदीप गुगळे (श्रीगोंदा) अश्या अनेक मान्यवरांनी आपले महत्वपूर्ण विचार मांडले. प्रियंका गुगळे यांनी लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करुन मुलांना प्रोत्साहित केले.

संतोष गुगळे तसेच ॲडमिन टीमचे सर्व सदस्य आणि पाथर्डी व शिराळ चिचोंडीच्या युवा मंचच्या महत्वपूर्ण सहयोगामुळे हा कार्यक्रम अभूतपूर्व यशस्वी झाला. तिलोत्तमा गुगळे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

get_footer();