आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अनधिकृत बांधकामाची तक्रार दिल्याने मारहाण

Spread the love

कोंढव्यात तीन जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार केल्याच्या रागातून तीन जणांनी एका व्यक्तीला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली तसेच कुटुंबाला मारण्याची धमकी दिली. हा प्रकार कोंढवा येथील बेलोसिमा अपार्टमेंटमध्ये घडला आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पंकज श्रीकांत देवळे (वय-41 रा. बेलोसिमा अपार्टमेंट, कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन आसिफ शेख (वय-30), जहिद शेख (वय-35), उमेश माने (वय-36 तिघे रा. बेलोसिमा अपार्टमेंट, कोंढवा खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी व आरोपी एकाच सोसायटीत राहतात. सोसायटीमध्ये फ्लॅट धारकांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. फिर्यादीने महापालिकेला केलेल्या अर्जामध्ये आरोपी आसिफ शेख व उमेश माने यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाची माहिती दिली होती.

याचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादी यांच्यासोबत वाद घातला. आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण करुन तुला इथे राहू देणार नाही अशी धमकी दिली. तसेच पत्नी व मुलाला मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांनी घटनास्थळी भेट दिली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत.

get_footer();