आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अनेकांतवाद हाच लोकशाहीचा खरा आत्मा : महावीर जोंधळे

Spread the love

अरिहंत जागृती मंच तर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन

पुणे : अनेकांतवाद हाच लोकशाहीचा खरा आत्मा आहे. तेच जैन धर्माचं मूळ आहे.

केवळ पूजा अर्चा करून, कर्मकांडातून धर्म टिकत नाही, तर विचारांतून, तत्त्वज्ञानातून तो टिकवावा लागतो. त्यासाठी धर्मांध होण्याची गरज नाही. धर्मांधता म्हणजे धर्माचं एक प्रकारे अवमूल्यनच होय.’

असे प्रतिपादन अरिहंत जागृती मंच तर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात महावीर जोंधळे यांनी केले.’ जैन धर्म: प्राचीन स्वतंत्र धर्म’ आणि ‘जैन सम्राट चंद्रगुप्त मौर्य एक शोध’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन महावीर जोंधळे यांचे हस्ते करण्यात आले.’

जैन सम्राट चंद्रगुप्त मौर्य एक शोध’ या पुस्तकाचे लेखक विठ्ठल साठे याप्रसंगी म्हणाले,” भारताची संस्कृती श्रमण संस्कृतीतून उदयाला आली. ऋषभनाथांनी त्याआधारेच इथली समाजव्यवस्था आणि संस्कृती रुजवली. वैदिक परंपरेच्या आधी श्रमणसंस्कृती इथं अस्तित्वात होती.”

ज्येष्ठ इतिहास संशोधक संजय सोनवणी या प्रसंगी म्हणाले,” सांस्कृतिक आक्रमण हे राजकीय आक्रमणापेक्षा विद्ध्वंसक आहे. सांस्कृतिक गुलामी टाळायची असेल तर खरा इतिहास सर्वांसमोर आला पाहिजे.

वैदिक चष्यातून भारताचा इतिहास लिहिला गेल्यानं बऱ्याच चुकीच्या गोष्टी त्यात आल्या आहेत.”तसेच प्रसिद्ध चित्रपट निर्माते निलेश नवलाखा म्हणाले,” जैन, बौद्ध आणि शीख या तीन धर्मांचे मूळ भारतीयच आहे. आज मात्र जैन धर्म अर्ध्या टक्क्यांवर आला आहे.

ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे.” या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकांत कोठारी होते. श्रीपाल ललवाणी यांनी सूत्रसंचालन केले.

विजय पारख यांनी आभार प्रदर्शन केले. शांतीनाथ जैन, अभय ललवाणी आणि अजय ललवाणी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अरिहंत जागृती मंचचे अध्यक्ष राजेन्द्र सुराणा यांनी प्रास्ताविक केले.

या समारंभास अचल जैन, मिलिंद फडे, विलास राठोड, राजेंद्र बांठिया, दिलीप कटके आदी मान्यवर तसेच जय आनंद ग्रुप, वीतराग सेवा संघ, जैन सोशल ग्रुप या संघटनांच्या सदस्यांसह लोकांची मोठी उपस्थिती होती.

समारंभ यशस्वी करण्यासाठी नितीन शहा, जवाहर गुमते, संजय चोरडिया, हितेश सुराणा, प्रदीप फिरोदिया, अजित पांढरे यांनी विशेष प्रयत्न केले.

get_footer();