आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अनोळखी महिलेने दागिने केले लंपास

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : गळ्यात घातलेल्या सोन्याच्या दागिन्याची चेन तुटली आहे, ती काढुन पर्स मध्ये ठेवा. असे सांगून एका मध्यम वयीन महिलेचे एक लाख रुपयांचे दागिने लंपास करण्याची घटना पुण्यातील मध्यवस्तीत भरदिवसा घडली आहे.

या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्दीमध्ये धक्का लागुन गळयातील मंगळसुत्र व चैन तुटली आहे असे सांगुन ते पर्स मध्ये ठेवण्यास सांगितले.

फिर्यादीची नजर चुकवुन पर्स मध्ये ठेवलेले १,००,०००/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरुन नेले. या प्रकरणी पीएमसी बिल्डींग, औंध येथिल महिलेने तक्रार नोंदवली आहे.

get_footer();