आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अमरावतीच्या फरार आरोपीस हडपसरमध्ये पकडले

Spread the love

पुणे : अमरावती पोलीसांना हव्या असलेल्या सराईत गुन्हेगारास हडपसर पोलिसांनी शुक्रवारी (दि.१९ जुलै) जेरबंद केले आहे.

तिवसा पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद असलेला आरोपी आकाश गोवींद शेंडगे (वय २४ रा. मांजरी पुणे) जामिनावर सुटला होता. त्यानंतर तिवसा पोलीस स्टेशन कडील पोलीस पथकाने संबंधीत आरोपीचा पुणे परिरारात येवून वारंवार शोध घेवून देखील तो त्यांना सापडत नव्हता.

त्यामुळे गुन्ह्याचे तपासी अधिकारी यांनी आरोपीचा शोध घेण्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन येथे कळवीले होते. तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस अंमलदार समीर पांडुळे आणि जोतीबा पवार शुक्रवारी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार समीर पांडुळे आणि जोतीबा पवार यांना आरोपी हा हडपसर परिसरात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.

त्यावरून त्यास हडपसर परिसरातुन पोलीसांनी ताब्यात घेतले. आरोपीस पुढील तपासकामी तिवसा पोलीस स्टेशन येथील पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५. आर राजा, यांचे मागदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन. संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उमेश गित्ते, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार समीर पांडुळे, जोतीबा पवार, यांच्या पथकाने केली आहे.

get_footer();