आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अलीम शेख यांचा सेवा निवृत्तीनिमित्त निरोप समारंभ

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • January 27, 2024
Spread the love

भूम : बाणगंगा हायस्कूल भूम ता. भूम जि. धाराशिव येथील शिक्षक अलीमोद्दिन शेख (अलीम सर) यांचा सेवा निवृत्तीनिमित्त आमदार राहुल मोटे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाणगंगा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव अॅड. रामहरी मोटे, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश शेंडगे, विलास शाळु, गायकवाड सर, संजय पाटील, विजय मोटे, विजय बोराडे, चंद्रमणी गायकवाड, आबा मस्कर, संतोष सुपेकर, रहिम सौदागर, उदय कुलकर्णी, बक्श पठाण, प्रदीप डोके, अलीम सर यांच्या मुली, जावई, त्यांचा मित्र परिवार, पत्रकार व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुंभार यांनी तर आभार मुख्याध्यापक मधुकर लिमकर यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य कै. महारुद्र (बप्पा) मोटे मा. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे हनुमंत यादव, मुख्याध्यापक रामेश्वर विद्यालय शिराळाचे नारायण कडेकर, मुख्याध्यापक, डॉ.प.पा. हायस्कूल, देवळालीचे रमेश बगाडे व बाणगंगा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

get_footer();