आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देताय ? सावधान

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News Slider, Social • March 26, 2024
Spread the love

पालकांविरुध्द पोलिसांनी केला गुन्हा दाखल : सिंहगड रोड पोलीसांची कारवाई

पुणे : अल्पवयीन मुलांना गाडी चालविण्यासाठी देत असाल तर वेळीच सावध व्हा.. तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. आपल्या अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देणाऱ्या पालकांविरुध्द सिंहगड रोड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ३ चे संभाजी कदम यांच्या आदेशानुसार धुलिवंदन सणानिमित्त तुकाई नगर सर्कल सिंहगड कॉलेज रोड येथे नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान दोन अल्पवयीन मुले त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल चालविताना सापडले. त्यांच्याकडे विचारपुस केली असता दोघांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे व दोघेही अल्पवयीन असल्याचे दिसुन आले.

दोन्ही अल्पवयीन मुलांना मोटरसायकल चालविण्यासाठी ताब्यात देणारे त्यांचे पालक/गाडीचे मालक यांना मुले अल्पवयीन असल्याचे माहीत असताना सुध्दा त्यांच्या नावावरील व ताब्यातील वाहने अल्पवयीन मुलांना चालविण्यासाठी दिल्याने पोलीस अंमलदार श्रावण शेवाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या गुन्हयातील वाहने जप्त करण्यात आलेली असुन मोटार वाहन कायदयातील तरतुदीनुसार अल्पवयीन मुलांना त्यांचे वयाचे २५ वर्षापर्यंत वाहन चालविण्याचा परवाना मंजुर करु नये याकरीता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे.

मोटार वाहन कायदयातील तरतुदीनुसार जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा परवाना एक वर्षासाठी रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे.

ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग भिमराव टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन विजय कुंभार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक, सुरेश जायभाय, दिपक गबदुले, होमगार्ड सोनवणे यांनी केली आहे.

पालकांनी आपले अल्पवयीन पाल्यांना वाहनाच्या मालकांनी आपले वाहन अल्पवयीन मुलांना तसेच वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालविण्याकरीता ताब्यात देऊ नये असे पोलीस विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करुन वाहने जप्त करुन पुढील कारवाई करण्यात येईल.

get_footer();