आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन मुलीची फसवणूक करणाऱ्या बिहारीस ठोकल्या बेडया

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, Police, Social • January 16, 2024
Spread the love

मार्केटयार्ड पोलीसांची कारवाई : ऑनलाईन गेमद्वारे मैत्री करून फसवणूक

पुणे : ल्पवयीन मुलीशी फ्रि फायर गेम मार्फत ऑन लाईन मैत्री करून, तिला धमकावणाऱ्या बिहारीस बेडया ठोकण्यात मार्केटयार्ड पोलीसांना यश आले आहे. अमनकुमार तांटी (वय. २० वर्षे धंदा. शिक्षण रा. वॉर्ड नं. ११, हरपुर जि. बेगुसुराई, राज्य बिहार) याला ताब्यात घेण्यात आले.

फिर्यादी यांची मुलगी हिच्याबरोबर ऑन लाईन फ्रि फायर गेम मार्फत ऑन लाईन मैत्री करून सन २०२३ मध्ये फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी हिला जिवे ठार मारील अशी धमकी दिली. तिचे न्यूड फोटो व्हाट्सअॅप व्दारे त्याला पाठविण्यास भाग पाडून त्याच्याशी रिलेशनशिप मध्ये नाही राहिली तर ते फोटेा तिच्या नातेवाईकांना पाठविल अशी वेळोवेळी धमकी दिली.
तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे न्यूड फोटो पाठवले असल्याने आरोपी याच्याविरूध्द मार्केट यार्ड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
दाखल झाल्यावर गुन्हयातील आरोपीचे पुर्ण नाव व पत्ता माहित नसताना फक्त मोबा. क्र. तक्रारीत नमुद होता. मोबाईल क्रंमाकांचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर आरोपीचा बिहार मधील अपुर्ण पत्ता मिळून आला. परंतू त्या नंतर सतत मोबा. क्र. चे क्लिष्ट तांत्रीक विश्लेषण करून हरपुर, जि. बेगुसुराय, राज्य बिहार असे लोकेशन येत असल्याने तपासी अधिकारी स्वप्नाली शिंदे, किशोर पोटे, पोलिस हवालदार अमित जाधव, धनश्री गोफणे असे तात्काळ बेगुसुराय बिहार येथे रवाना झाले. तेथे त्यांनी वेषांतर करून आरोपीची सर्व माहिती घेतली व त्यानंतर बिहार पोलीसांच्या मदतीने संवेदनशील भागातून आरोपी याला रिफायनरी ओ. पी. (बरौली थाना) यांच्या मदतीने शिताफिने अटक केले. गुन्हयात वापरलेला मोबाईल फोन हस्तगत केला.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पुर्व विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त परि. ५ आर. राजा., सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग शाहूराजे साळवे, मार्केट यार्ड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड, यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या पथकाने केली आहे.

get_footer();