आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या वृद्धाला जन्मठेप

Spread the love

सोलापूर : साडेतीन वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वृद्धाने अत्याचार केले. याप्रकरणी दशरथ शेळके या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास ६ महिने कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

फिर्यादी त्याच्या वडीलासोबत कपडयाचा बाजार करुन घरी परतला. ऊसाच्या पिकाला पाणी देण्यासाठी वस्तीच्या जवळ गेला. त्यावेळी त्याची पत्नी, मुलगी व मुलगा असे घरी होते. त्याची पत्नी जनावराचा चारा कापुन त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दशरथ शेळके याच्या घरासमोरुन जात असताना तिला गैरप्रकार लक्षात आला.

त्यांनी फिर्याद दिली. या प्रकरणाची सुनावणी संगिता शिंदे सो, जिल्हा व सत्र न्यायाधीश-३, सोलापूर यांच्या न्यायालयात झाली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपुत यांनी काम पाहिले. जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी आरोपीने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा वैद्यकीय पुराव्याद्वारे तसेच फिर्यादी, फिर्यादीची पत्नी व त्यानी अल्पवयीन मुलगी यांच्या साक्षीपुराव्याद्वारे अपराध सिध्द केला.

तसेच आरोपीने केलेले कृत्य हे माणुसकीला काळीमा फासणारे आहे त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त कठोर शिक्षा करावी असा युक्तीवाद केला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले.

यामध्ये फिर्यादी, फिर्यादीची पत्नी, अल्पवयीन पिडीत मुलगी, वैद्यकीय अधिकारी, घटनास्थळ पंच, कपडे जप्ती व तपासी अमंलदार यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. याकामी आरोपीतर्फे अॅड. धनंजय माने यांनी काम पाहीले, तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार जाधव यांनी काम पाहिले व प्रभारी अधिकारी ए.पी.आय. उदार यांनी सहकार्य केले.

get_footer();