आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अल्प दरातील एम.आर.आय व सिटी स्कॅनचे उद्‌घाटन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News Slider, Other, Sports • February 19, 2024
Spread the love

पुणे : येथील डायग्नोपिन या संस्थेच्या वतीने नगर येथील सुरभि हॉस्पिटल मध्ये सवलतीच्या दरात एम.आर.आय आणि सिटी स्कॅन सुविधेचे उद्घाटन अहमदनगर महानगपालिकाचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. जावळे म्हणाले की, डायग्नोस्टिक सेवेची आज समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. आज दिवसेंदिवस अनेक रोगाचे प्रमाण हे वाढत आहे व रोगाचे योग्य वेळी निदान झाले तर भविष्यात येणारे धोके टाळता येऊ शकतात. परंतु आज डायग्नोस्टिक मध्ये तपासणी करण्याकरिता मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागतात, त्यामुळे तपासण्या टाळल्या जातात व वेळेवर उपचार न झाल्याने भविष्यात आरोग्याच्या मोठ्या संकटाना सामोरे जावे लागते.


डायग्नोपिन डायग्नोस्टिक सेंटर पुणे, मुंबई, दिल्ली, नागपूर या ठिकाणी अनेक शाखेद्वारे सेवा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. उत्तम व उच्च प्रतीच्या सेवा कमी दरात उपलब्ध करून देणे व योग्य निदान रुग्णांना देणे हेच ब्रीद वाक्य घेवून डायग्नोपिन डायग्नोस्टिक सेंटर सर्व ठिकाणी कार्य करीत आहे.
त्याचप्रमाणे डायग्नोपिन आणि सुरभि हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर शहरात नाममात्र दरात म्हणजेच सर्व प्रकारचे एम.आर.आय फक्त 1900/- रुपयात व सर्व प्रकारचे सिटी स्कॅन फक्त 900/- रुपयात ही सेवा अहमदनगर शहरात उपलब्ध केली आहे.


या कार्यक्रमास डायग्नोपिनचे प्रफुल्ल कोठारी आणि मितेश कोठारी, सेवानिवृत्त महापालिका सहाय्यक आयुक्त नागनाथ पवळे, वसंत थोरात, सुरभि हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. वैभव अजमेरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर जंगम, मुख्य प्रशासकीय अधिकारी ॲड. गणेश शेंडगे, मुख्य ऑपरेशनल अधिकारी डॉ. गणेश जंगले, मार्केटिंग हेड डॉ. अमितकुमार पवार, रेडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. प्रितेशकुमार कटारिया, शांतिलाल बोरा, गौतम बुरड, किशोर छोरिया, राहुल कर्नावट, प्रणय चोरडिया आदींसह मान्यवर उपस्थित होते.

get_footer();