आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अवैध गावठी देशी दारूच्या हातभट्टया उदध्वस्त

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, People, Police, Social • February 16, 2024
Spread the love

सोलापूर तालुका पोलीसांची कामगिरी

सोलापूर : सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात चोरून चालणाऱ्या 41 हजार 300 लिटर गुळमिश्रीत रसायन हातभट्टी दारू जागेवरच नष्ट करण्यात आल्या आहेत. 4205 लिटर हातभट्टी दारू व 93 देशी विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या असून पोलिसांनी अवैध जुगार खेळणाऱ्या 12 इमसा विरूध्द गुन्हे दाखल केले आहेत. एकूण 23 लाख 28 हजार 585 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आगामी लोकसभा निवडणुक-2024 ची प्रक्रिया शांततेत पार पाडुन निवडणुकीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या हद्दीतील गुळवंची, सेवालालनगर, भानुदास तांडा व वडजी या परिसरात चोरून चालणा-या अवैध हातभट्टी दारूच्या भट्टया उध्दवस्त करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत विशेष मोहीम राबवुन पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेसह चोरून अवैधरित्या चालणाऱ्या दारूच्या हातभट्टया वर छापे टाकुन कारवाई केली आहे.


अवैधरित्या चालणाऱ्या देशी दारूच्या हातभट्टयावर टाकलेल्या छापा कारवाईत एकूण 16 लाख 64 हजार रूपये 200 रूपये किंमतीचे त्यामध्ये 41 हजार 300 लिटर गुळमिश्रीत रसायन, 406 प्लॅस्टीक बॅरेल मध्ये भरून ठेवलेली गावंठी हातभट्टी दारू तयार करणे करीता लागणारे साहित्य तसेच अवैधरित्या दारूच्या हातभट्टया उध्दवस्त करून प्लॅस्टीक बॅरेल जागीच फोडुन त्यातील गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले आहे.

गुळवंची, सेवालालनगर, भानुदासतांडा व वडजी या ठिकाणी चोरून अवैध दारूच्या हातभट्टया उध्दवस्त केलेल्या ठिकाणी एकूण 21 इसमा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्या कलम 65 फ अन्वये 21 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दाखल करण्यात आलेल्या गुन्हयाच्या तपास सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार याचेकडुन होत आहे. यापुर्वी देखील सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात चोरून चालणाऱ्या अवैध देशी गावंठी दारूच्या हातभट्टया उदध्वस्त करून कारवाई करून संबंधीत इसमा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


मौजे कासेगाव, गुळवंची, पाकणी, कळमण, तिऱ्हे, गावंडीदारफळ, मार्डी, तांदुळवाडी, सेवालालनगर, भानुदासतांडा व मुळेगाव या ठिकाणी चोरून अवैधरित्या दारूची विक्री करणारे 15 इसमा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्या कलम 65 ई अन्वये गुन्हे दाखल करून संबंधीत इसमाकडुन 4684 लिटर हातभट्टी दारू व 93 देशी विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण 2 लाख 58 हजार 315 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मुळेगाव तांडा व तळेहिप्परगा येथे अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या एकूण 12 इसमा विरूध्द महाराष्ट्र जुगार अधिनियमान्वये 2 गुन्हे दाखल करून त्याचे कडुन 5 दुचाकी मोटार सायकल वाहने, जुगाराचे साहित्य एकूण 4 लाख 6 हजार 70 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

यापुढेही अशा व इतर प्रकारच्या चोरून अवैध व्यवसाय करणा-या इसमा बाबत गोपनियरित्या माहिती प्राप्त करून त्यांचे विरूध्द कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे चोरून अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमाचा गुन्हेगारी अभिलेख पडताळुन त्यांचे विरूध्द तडीपार, एम.पी.डी.ए. (MPDA) सारख्या प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे काम चालु आहे.


संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांनी सांगितले आहे. सदरची छापा कारवाई शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली नामदेव शिंदे, पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी बजावली आहे.

get_footer();