आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले

Spread the love

पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांचा परिसरात दरारा

सोलापूर : वैराग ता.बार्शी येथील पोलीस स्टेशनमध्ये काही दिवसांपूर्वी नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांचा अल्पावधीतच कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून नावलौकिक झाल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

वडाळा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना एकाला लाथा बुक्क्यांनी व तलवारीने मारहाण करणारास शिक्षेच्या दारापर्यंत घेऊन जाण्याची कामगिरी केली असल्याने त्यांचा दरारा मोठा आहे. आरोपीने घराचे भाडे मागितल्याचा राग धरुन घर मालकास बेदम मारहाण केली होती.

तपास अधिकारी निवृत्ती मोरे यांनी घटनेचा सखोल अभ्यास करुन फिर्यादीला न्याय मिळवून दिला आहे. आरोपीला सत्र न्यायाधीश कोर्ट क्रमांक ५६, मुंबई यांनी शुक्रवारी सुनावणी करताना आजन्म कारावास व ३००० रुपये दंड ठोठावला आहे.

सदरक्षणाय खलनिग्रहनाय हे ब्रीद जगणारे अधिकारी वैराग पोलीस स्टेशनला लाभले असून येत्या निवडणुकीत शाब्दिक दहशत, हाणामारी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा जणू इशाराच त्यांनी दिला असल्याची चर्चा वैराग परिसरात आहे.

get_footer();