आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अहिंसा दौड 2024 चे आयोजन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider • April 22, 2024
Spread the love

अहिंसा दौड 2024 चे आयोजन

पुणे : उपाध्याय श्री प्रवीणऋषीजी म. सा. व तीर्थेशऋषीजी म.सा.यांच्या आशीर्वादाने महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त अहिंसा दौड 2024 चे आयोजन करण्यात आले होते.

ही दौड गोयल गार्डन मार्केटयार्ड येथून चिंचवड स्टेशन कल्याण प्रतिष्ठान येथे 25 किलोमीटर होती. ग्रुपचे संस्थापक राजेश ताथेड, राजश्री ताथेड, रचना ताथेड, रेना ताथेड या दौडमध्ये सहभागी झाल्या होत्या. या दौडच वैशिष्ट्य म्हणजे एक अवघ्या 13 वर्षाचा मुलगा अरहम योगेश संचेती यांनी ही या मध्ये सहभाग घेतला होता. सुमारे 25 हून अधिक नागरीक यामध्ये सहभागी झाले होते.

राजेश ताथेड यांनी या अगोदर पण अहिंसाचा संदेश “जिओ और जीने दो” देण्यासाठी पुणे ते पालीताना अवघ्या सहा दिवसात 800 किलोमीटर सायकल वरती प्रवास केला होता. या रॅलीसाठी दीपक खिंवसरा, योगेश संचेती, गिरीश सोळंकी, दुर्गेश अब्बड, निलेश दर्डा, अशोक बागमार, दिलीप मुनोत यांनी सहकार्य केले.

get_footer();