आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आंदोलनाच्या उंबरठ्यावर बीएमसीसी

Spread the love

पुणे : बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (BMCC) ऐतिहासिक आणि हिरवळीने नटलेल्या मैदानावर DES प्रायव्हेट युनिव्हर्सिटी व संबंधित संस्थेकडून तब्बल 60,000 चौरस फूट क्षेत्रफळाची नवीन इंजिनिअरिंग कॉलेज इमारत उभारण्याचे नियोजन सुरू आहे.

हे प्रस्तावित बांधकाम पूर्णपणे खेळाच्या मैदानावर होत असून, असे असताना संपूर्ण कॅम्पस परिसरात इतर मोकळ्या जागा असताना मैदानावरच अतिक्रमण का? असा रोष युवक काँग्रेसने व्यक्त केला आहे.

या माध्यमातून शिक्षणाच्या नावाखाली मैदानाचा विनाश आणि पर्यावरणाची गळचेपी केली जात आहे. हे भूमिपूजन दिनांक २२ मे २०२५ रोजी ठेवण्यात आले असून, ते थांबवले नाही, तर आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे.

गेल्या ८० वर्षांपासून हे मैदान हजारो विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घडवत आले आहे. परिसरातील नागरिकही याचा आरोग्यदायी उपयोग करतात. सुमारे २५% मैदानाचा भाग आणि १०० हून अधिक जुनी झाडे या इमारतीसाठी नष्ट केली जाणार असल्याचे समजते.

या भूमिपूजनाविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने बीएमसीसी व्यवस्थापनाला निवेदन देत तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. यावेळी प्रदेश मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन, विद्यार्थी काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूषण राणभरे, युवक प्रदेश सचिव आनंद दुबे, मेघश्याम धर्मावत, तसेच सद्दाम शेख, अभिजीत हळदेकर, राज जाधव, अक्षय कांबळे, राकेश जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.

get_footer();